शिक्षणदीप या शैक्षणिक डिजिटल ई मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न ....
शिक्षकमंच जळगाव संचलित, शिक्षणदीप या आमच्या शैक्षणिक डिजिटल ई मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सप्टेंबर 2024 या महिन्यापासून विद्यार्थी व शिक्षकांसाठी शैक्षणिक डिजिटल ई मासिक सुरू करण्यात येत आहे.
♦️ शिक्षणदीप ई मासिक अंक १ ला सप्टेंबर २०२४ वाचण्यासाठी, डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
महावाचन चळवळीचा एक भाग म्हणून शैक्षणिक डिजिटल ई मासिक हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, ज्ञानवृद्धीसाठी आणि साहित्यिक तसेच सांस्कृतिक क्षमता विकसित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल. या मासिकाद्वारे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व साहित्यिक विषयांवर लेख, निबंध, कविता, माहिती इत्यादी प्रकाशित करण्याची संधी मिळेल. तसेच, या मासिकाद्वारे विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या लेखन कौशल्यांचा विकास होण्यास मदत होईल व त्यांची विचारशक्ती वाढेल.
सदर ई मासिक दरमहा सर्वाँना pdf स्वरूपात निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल.
जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात या डिजिटल ई मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
📕'शिक्षणदीप' डिजिटल मासिक फ्लिपबुक स्वरूपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 👈
या कार्यक्रमासाठी ग्रामविकास व पर्यटन मंत्री महाराष्ट्र मा. गिरीशभाऊ महाजन, मा. खासदार स्मिताताई वाघ, मा. आमदार लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद साहेब, मुख्यकार्यकारी अधिकारी मा. अंकित साहेब, मा. अनिल झोपे साहेब, प्राचार्य DIET, मा. विकास पाटील साहेब, शिक्षणाधिकारी, मा. विजय सरोदे साहेब, उपशिक्षणाधिकारी, मा. नरेंद्र चौधरी साहेब, उपशिक्षणाधिकारी व इतर मान्यवर व जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.








