Wednesday, November 20, 2024

अंक 3 रा. नोव्हेंबर 2024. शिक्षणदीप शैक्षणिक ई मासिक

  शिक्षकमंच जळगाव संचलित 

शिक्षणदीप या डिजिटल ई मासिकाचे दर महिन्याचे अंक आता वाचा व डाऊनलोड करा ते ही निःशुल्क ....

शिक्षणदीप या डिजिटल ई मासिकाचे दर महिन्याचे अंक वाचण्यासाठी व डाऊनलोड करण्यासाठी मासिकाच्या इमेज ( फोटो ) वर क्लिक करा. 👇

3) अंक 3 रा. नोव्हेंबर 2024


2) अंक 2 रा. ऑक्टोबर 2024


1) अंक 1 ला, सप्टेंबर 2024



🙏🏻 कोअर टीम/ संपादक मंडळ
शिक्षकमंच जळगाव / शिक्षणदीप ई मासिक


Thursday, September 5, 2024

शिक्षणदीप डिजिटल ई मासिकाचे प्रकाशन



शिक्षणदीप या शैक्षणिक डिजिटल ई मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न ....

शिक्षकमंच जळगाव संचलित, शिक्षणदीप या आमच्या शैक्षणिक डिजिटल ई मासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सप्टेंबर 2024 या महिन्यापासून विद्यार्थी व शिक्षकांसाठी शैक्षणिक डिजिटल ई मासिक सुरू करण्यात येत आहे.

♦️ शिक्षणदीप ई मासिक अंक १ ला सप्टेंबर २०२४ वाचण्यासाठी, डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

   महावाचन चळवळीचा एक भाग म्हणून शैक्षणिक डिजिटल ई मासिक हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, ज्ञानवृद्धीसाठी आणि साहित्यिक तसेच सांस्कृतिक क्षमता विकसित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल. या मासिकाद्वारे शिक्षकांना व विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व साहित्यिक विषयांवर लेख, निबंध, कविता, माहिती इत्यादी प्रकाशित करण्याची संधी मिळेल. तसेच, या मासिकाद्वारे विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या लेखन कौशल्यांचा विकास होण्यास मदत होईल व त्यांची विचारशक्ती वाढेल.

सदर ई मासिक दरमहा सर्वाँना pdf स्वरूपात निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल.

जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात या डिजिटल ई मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

📕'शिक्षणदीप' डिजिटल मासिक फ्लिपबुक स्वरूपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 👈

   या कार्यक्रमासाठी ग्रामविकास व पर्यटन मंत्री महाराष्ट्र मा. गिरीशभाऊ महाजन, मा. खासदार स्मिताताई वाघ, मा. आमदार लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी मा. आयुष प्रसाद साहेब, मुख्यकार्यकारी अधिकारी मा. अंकित साहेब, मा. अनिल झोपे साहेब, प्राचार्य DIET, मा. विकास पाटील साहेब, शिक्षणाधिकारी, मा. विजय सरोदे साहेब, उपशिक्षणाधिकारी, मा. नरेंद्र चौधरी साहेब, उपशिक्षणाधिकारी व इतर मान्यवर व जिल्ह्यातील शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.









Wednesday, July 24, 2024

अध्ययन निष्पत्ती इयत्ता 1 ली ते 8 वी

  


Learning Outcomes For Standard 1st To 8th 

इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती ( अध्ययन निष्पत्ती क्रमांकासह )

इयत्ता 1 ली ते 8 वी 

खाली दिलेल्या Table मधून तुम्ही प्रत्येक वर्गाची स्वतंत्र अध्ययन निष्पत्ती फाईल Pdf स्वरूपात डाऊनलोड करू शकतात. 👇

Learning Outcomes For Std. 1 st To 8

इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्ती

इयत्ता 1 ली ते 8 वी

अनु. नं.

इयत्ता

अध्ययन निष्पत्ती File ( PDF)

1

पहिली

इथे क्लिक करा. 👈

2

दुसरी

इथे क्लिक करा. 👈

3

तिसरी

इथे क्लिक करा. 👈

4

चौथी

इथे क्लिक करा. 👈

5

पाचवी

इथे क्लिक करा. 👈

6

सहावी

इथे क्लिक करा. 👈

7

सातवी

इथे क्लिक करा. 👈

8

आठवी

इथे क्लिक करा. 👈

Monday, July 22, 2024

शिक्षण सप्ताह साजरा करणे बाबत

 


शिक्षण सप्ताह साजरा करणे.

22 जुलै ते 28 जुलै 2024

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत "शिक्षण सप्ताह" साजरा करणेबाबत  पत्रान्वये कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवडयाचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, ज्यात शिक्षण व विकासाच्या विविधा पैलूंचा समावेश आहे, हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारकांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे. शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.

👇 शिक्षण सप्ताह साजरा करणे बाबत शासन परिपत्रक 

Sunday, July 21, 2024

डिजीटल ई मासिकासाठी साहित्य पाठविणे बाबत

 


🔹 *शिक्षकमंच जळगाव*

      जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना कळविण्यात आनंद होतो की, शिक्षकमंच जळगाव संचलित डिजिटल ई मासिक ऑगस्ट 2024 या महिन्यापासून दरमहा 10 तारखेला प्रसिद्ध केले जाणार आहे.

    सदर ई मासिक जळगाव जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचे व्यासपीठ असणार आहे.

 या डिजिटल  मासिकाचा पहिला अंक 15 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण राज्यात प्रसारित केला जाईल.

तरी आपणास साहित्य पाठवण्याचे आवाहन करित आहे.

  ▪️ मासिकासाठी खालील साहित्य पाठवू शकता.
कथा, लेख, कविता, चित्रकाव्य, प्रवास वर्णन, पुस्तक परिचय, मुलाखत, शब्द कोडी, हास्यचित्रे, व्यंगचित्रे इ.
  ▪️ सदर मासिकासाठी खालील विषयांवर साहित्य मागविले जात आहे. सदर मासिकासाठी आपण आपले स्वतःचे तसेच विद्यार्थ्यांचे साहित्य खालील व्हाट्सअप नंबर किंवा ई-मेल आयडीवर पाठवू शकता.
Mail ID - shikshakmanchjalgaon@gmail.com

WhatsApp no. 8806506804
9923875125

▪️ विषय -
1) शिक्षकांनी शाळेत राबविलेला नवोपक्रम ( उपक्रमाची माहिती फोटोंसह )
2) शिक्षकांची/ विद्यार्थ्यांची स्व लिखित कविता
3) विद्यार्थ्यांनी काढलेली, रंगविलेली चित्रे
4) शाळेची बातमी ( उपक्रम संदर्भात - फोटो सह )
5) शिक्षक / विद्यार्थी गौरव , पुरस्कार प्राप्त बाबत
6) स्व लिखित लेख - खालील विषयांवर
A) शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन
B) 21 व्या शतकातील कौशल्ये
C) भारताचा स्वातंत्र्यदिन
D) थोर स्वातंत्र्यसेनानी
E) तंत्रज्ञान वापर
F) पर्यावरण शिक्षण
G) इतर शैक्षणिक, सामाजिक विषय

📌  मासिकासाठी साहित्य/लेख/ बातमी/ कविता पाठविताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात.
१) टाईप केलेले डॉक्युमेंट फाईल किंवा मोबाइल वर टाईप करून पाठवावे. ईमेलने किंवा Whats App वर साहित्य पाठवू शकता.
२) साहित्यात योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर केलेला असावा. शुद्धलेखनाचे नियम पाळावे.
३) साहित्य पाठवतांना त्यात कोणत्याही प्रकारचे इमोजी, अथवा स्टार्सचा वापर करु नये.
४) आक्षेपार्ह, राजकीय, जातिभेद तेढ निर्माण करणारे साहित्य नसावे. साहित्य नकारात्मक नसावे.
५) सोबत आपला एक फोटो व अल्प परिचय द्यावा.
६) लेख शब्द मर्यादा ३०० पर्यंत. सोबत लेखासंबंधी एक/दोन फोटो देता येईल.
७) साहित्य स्वतःचे असावे. तसेच साहित्य पूर्वी कुठेही प्रकाशित झालेले नसावे.
८) विद्यार्थ्यांचे साहित्य पाठविताना ( चित्र, काव्य ) सोबत त्यांची माहिती व फोटो पाठवावा.
▪️ टिप - आपले साहित्य, माहिती, लेख, कविता इ. 4 ऑगस्ट 2024 पूर्वी  पाठवावे.

🙏 कोअर टीम 🙏
 शिक्षकमंच जळगाव

https://shikshakmanchjalgaon.blogspot.com/

Welcome सुस्वागतम

 

Welcome.... सुस्वागतम 

🔹 शिक्षकमंच जळगाव ( SMJ ) 🔹

 आदरणीय शिक्षक बंधू भगिनींना सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏

आपण सर्वजण शिक्षण क्षेत्रात पवित्र कार्य करीत आहोत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी आपण सर्व गुरुजन प्रयत्नशील आहोत. 

   आपल्या जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यवसाय वाढीसाठी ( CPD ) आपण सर्वांच्या सहकार्याने *शिक्षकमंच जळगाव* या जिल्हास्तरीय Platform ची सुरुवात करीत आहोत.

  *शिक्षकमंच जळगाव* या समुहामार्फत विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

  *यात ई मासिक, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाईन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, काव्यलेखन, कथालेखन, शिक्षकांसाठी ऑनलाईन तंत्रज्ञान कार्यशाळा, विविध उपक्रम व त्यांची प्रसिद्धी इ. विविध बाबी केल्या जाणार आहेत.*

    *शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाची, उपक्रमांची माहिती संपूर्ण जिल्ह्यातील व राज्यातील इतर शिक्षकांना व्हावी व त्याचा उपयोग इतर शिक्षक व विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी शिक्षकमंच जळगाव काम करणार आहे.*

    लवकरच याबाबत अधिक माहिती व स्वरूप आपणापर्यंत पोहचविण्यात येईल. 

     विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील कौशल्ये प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्व SMART TEACHER होऊया व SMART WORK करूया.


🙏 शिक्षकमंच जळगाव

( कोअर टीम सदस्य )

▪️ *श्री. संदिप सोनार, जामनेर*

▪️ *श्री. सुनील बडगुजर, मुक्ताईनगर*

▪️ *श्री. राहुल चौधरी, जळगाव*

▪️ *श्री. प्रभात तडवी धरणगाव*

▪️ *श्री. भूषण महाले, अमळनेर*

▪️ श्री. मनोहर तेजवानी, जळगाव 

▪️ श्री. संभाजी हावडे, जामनेर




अंक 3 रा. नोव्हेंबर 2024. शिक्षणदीप शैक्षणिक ई मासिक

   शिक्षकमंच जळगाव संचलित  शिक्षणदीप या डिजिटल ई मासिकाचे दर महिन्याचे अंक आता वाचा व डाऊनलोड करा ते ही निःशुल्क .... शिक्षणदीप या डिजिटल ई ...