Sunday, July 21, 2024

Welcome सुस्वागतम

 

Welcome.... सुस्वागतम 

🔹 शिक्षकमंच जळगाव ( SMJ ) 🔹

 आदरणीय शिक्षक बंधू भगिनींना सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐🙏

आपण सर्वजण शिक्षण क्षेत्रात पवित्र कार्य करीत आहोत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी आपण सर्व गुरुजन प्रयत्नशील आहोत. 

   आपल्या जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी व शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यवसाय वाढीसाठी ( CPD ) आपण सर्वांच्या सहकार्याने *शिक्षकमंच जळगाव* या जिल्हास्तरीय Platform ची सुरुवात करीत आहोत.

  *शिक्षकमंच जळगाव* या समुहामार्फत विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

  *यात ई मासिक, शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी विविध ऑनलाईन स्पर्धा, प्रश्नमंजुषा, काव्यलेखन, कथालेखन, शिक्षकांसाठी ऑनलाईन तंत्रज्ञान कार्यशाळा, विविध उपक्रम व त्यांची प्रसिद्धी इ. विविध बाबी केल्या जाणार आहेत.*

    *शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाची, उपक्रमांची माहिती संपूर्ण जिल्ह्यातील व राज्यातील इतर शिक्षकांना व्हावी व त्याचा उपयोग इतर शिक्षक व विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी शिक्षकमंच जळगाव काम करणार आहे.*

    लवकरच याबाबत अधिक माहिती व स्वरूप आपणापर्यंत पोहचविण्यात येईल. 

     विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील कौशल्ये प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्व SMART TEACHER होऊया व SMART WORK करूया.


🙏 शिक्षकमंच जळगाव

( कोअर टीम सदस्य )

▪️ *श्री. संदिप सोनार, जामनेर*

▪️ *श्री. सुनील बडगुजर, मुक्ताईनगर*

▪️ *श्री. राहुल चौधरी, जळगाव*

▪️ *श्री. प्रभात तडवी धरणगाव*

▪️ *श्री. भूषण महाले, अमळनेर*

▪️ श्री. मनोहर तेजवानी, जळगाव 

▪️ श्री. संभाजी हावडे, जामनेर




No comments:

Post a Comment

अंक 3 रा. नोव्हेंबर 2024. शिक्षणदीप शैक्षणिक ई मासिक

   शिक्षकमंच जळगाव संचलित  शिक्षणदीप या डिजिटल ई मासिकाचे दर महिन्याचे अंक आता वाचा व डाऊनलोड करा ते ही निःशुल्क .... शिक्षणदीप या डिजिटल ई ...